Viral Video: स्टंपची अदलाबदल केली राव, तरी विकेट काही मिळेना! ध्रुव जुरेलचा भन्नाट जुगाड; VIDEO तुफान व्हायरल

Dhruv Jurel Viral Video: भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटीच्या पाचव्या दिवशी ध्रुव जुरेलचा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. श्रीलंकेचा फलंदाज सोनल दिनुषा मैदानावर टिकून राहिल्याने विकेट मिळवण्यासाठी जुरेलने चक्क स्टंपची अदलाबदल केली. त्याचा हा भन्नाट जुगाड पाहून चाहतेही हसू आवरू शकले नाहीत.
Dhruv Jurel viral video stumps swap

Dhruv Jurel stumps swap viral cricket video

esakal

Updated on

Dhruv Jurel Viral Video: भारत आणि श्रीलंका(ind vs sl) यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवशी ध्रुव जुरेलचा एक मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. श्रीलंकेचा फलंदाज सोनल दिनुषा बराच वेळ मैदानावर टिकून राहिल्याने भारतीय संघ विकेटच्या शोधात होता. यावेळी जुरेलने नशीब बदलण्यासाठी चक्क बेल्ससोबत स्टंपचीही अदलाबदल केली.

क्रिकेटमध्ये विकेट मिळत नसताना अनेकदा खेळाडू बेल्सची जागा बदलताना दिसतात. मात्र, जुरेलने यावेळी थेट स्टंपच एकमेकांच्या जागी लावले. त्याचा हा प्रकार पाहून मैदानावरील खेळाडूंसह चाहतेही चांगलेच हसले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com