Andy Pycroft ने खरंच माफी मागितली का? पाकिस्तानकडून पसरवल्या जाणाऱ्या निवेदनाचं सत्य आलं समोर; ICC चे सूत्र म्हणतात...

ICC response to PCB claim on Andy Pycroft apology : आशिया चषक २०२५ मधील भारत-पाकिस्तान सामना संपल्यानंतर PCB ने धक्कादायक दावा केला होता. सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांनी पाकिस्तानच्या कर्णधार व व्यवस्थापकाची माफी मागितल्याचे PCB ने जाहीर केले. हा दावा लगेचच पाकिस्तान मीडियामध्ये मोठ्या प्रमाणावर पसरवला गेला.
Andy Pycroft apology row: PCB’s claim vs ICC’s clarification sparks debate

Andy Pycroft apology row: PCB’s claim vs ICC’s clarification sparks debate

esakal

Updated on
Summary
  • पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने अँडी पायक्रॉफ्ट यांच्या निलंबनाची मागणी केली आणि UAE विरुद्धच्या सामन्यावर बहिष्काराची धमकी दिली होती

  • आयसीसीने निलंबनाच्या मागणीला केराची टोपली दाखवली आणि PCB वर दबाव आणला.

  • नंतर PCB ने निवेदन काढून पायक्रॉफ्ट यांनी माफी मागितल्याचा दावा केला, पण तो व्हिडिओ आवाजाशिवाय व्हायरल झाला.

Did Andy Pycroft apologise to Pakistan cricket team? पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने काल प्रचंड ड्रामा केला... अँडी पायक्रॉफ्ट यांच्या निलंबनाची मागणी करत पाकिस्तानने UAE विरुद्धच्या लढतीवर बहिष्काराची पोकळ धमकी दिली. PAK vs UAE लढतीपूर्वी पाकिस्तानने पत्रकार परिषद घेतली नाही. सामना सुरू होण्याची वेळ जवळ आली होती, तरीही ते हॉटेलमध्येच थांबले होते. त्यामुळे सामना तासभर उशीरा सुरू करण्यात आला. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे ( PCB ) अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी सायंकाळी ट्विट करून खेळाडू हॉटेलकडून स्टेडियमकडे रवाना झाल्याचे सांगितले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com