RCB ला सलग दोनदा IPL चॅम्पियन बनवणारे कोच आता इंग्लंडचे मुख्य प्रशिक्षक? दिनेश कार्तिकचं मोठं विधान चर्चेत

Dinesh Karthik on Andy Flower as England Test Head Coach: ब्रेंडन मॅक्युलमला इंग्लंडने कसोटी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदावरून काढले आहे. त्यामुळे सध्या ही जागा रिकामी असून त्यासाठी RCB चे सध्याचे प्रशिक्षक प्रबळ दावेदाव आहेत. याबाबत दिनेश कार्तिकने प्रतिक्रिया दिली आहे.
Dinesh Karthik on Andy Flower as England Test Head Coach

Dinesh Karthik on Andy Flower as England Test Head Coach

Sakal

Updated on

England Test Cricket Coach Search: इंग्लंड क्रिकेट बोर्डाने बेन स्टोक्सच्या निवृत्तीनंतर कसोटी संघाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी ब्रेंडन मॅक्युलमला कसोटी संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून काढले आहे. त्यामुळे सध्या इंग्लंडच्या कसोटी संघाला कर्णधार आणि मुख्य प्रशिक्षक नाहीये.

अशातच मुख्य प्रशिक्षकासाठी एक नाव चर्चेत आहे, ते म्हणजे अँडी फ्लॉवर (Andy Flower). पण गेल्या दोन आयपीएल हंगामात फ्लॉवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे (RCB) मार्गदर्शन करत आहेत. आता याबाबत दिनेश कार्तिकने (Dinesh Karthik) भाष्य केले आहे.

Dinesh Karthik on Andy Flower as England Test Head Coach
IND Vs ENG ODI: मजबूत फलंदाजी हीच जमेची बाजू; भारत-इंग्लंड यांच्यात आजपासून एकदिवसीय क्रिकेट मालिका
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com