
लीड्समधील हेडिंग्ले येथे भारत आणि इंग्लंड संघात कसोटी मालिकेतील पहिला सामना शुक्रवारपासून (२० जून) सुरू झाला आहे. या सामन्यात भारताच्या फलंदाजांनी सर्वांची मनं जिंकली, विशेषत: कर्णधार शुभमन गिल, रिषभ पंत आणि यशस्वी जैस्वालने.
या तिघांनीही पहिल्या डावात शतके केली. दरम्यान, रिषभ पंतने दुसऱ्या दिवशी शतक पूर्ण केले, त्यामुळे तो भारताचा कसोटीत सर्वाधिक शतके करणारा यष्टीरक्षक फलंदाजही ठरला. त्याने एमएस धोनीच्या ६ शतकांच्या विक्रमाला मागे टाकले.