

Dinesh Karthik criticizes Team India
Sakal
Dinesh Karthik angry over Harshit Rana issue : भारतीय टी२० संघ सध्या युरोपमध्ये संघर्ष करताना दिसत आहे. भारतीय संघाला आयर्लंडविरुद्ध टी२० मालिका पराभूत झाल्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या टी२० मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतरचे दोन्ही सामने भारताने पराभूत झाले आहेत. त्यातही नॉटिंगघममधील ट्रेंट ब्रिजवर झालेल्या तिसऱ्या टी२० सामन्यात इंग्लंडने भारताला १२५ धावांनी पराभवाचा मोठा धक्का दिला.
त्यामुळे इंग्लंडने ५ सामन्यांच्या टी२० मालिकेत २-० अशी आघाडी घेताना मालिकेतील पराभवही टाळला आहे. दरम्यान, तिसऱ्या टी२० सामन्यात भारताची फलंदाजी नाट्यमयरित्या कोलमडली. असे असतानाही फलंदाजी क्रमवारीबाबतच्या भारतीय संघव्यवस्थापनाच्या निर्णयांवर माजी क्रिकेटपटू आणि समालोचक दिनेश कार्तिकने (Dinesh Karthik) तिखट शब्दात टीका केली आहे.