IND vs ENG 3rd T20I: टीम इंडियाचे घालीन लोटांगण! इंग्लंडने ७६ धावांवर श्रेयस अय्यरच्या संघाला गुंडाळले; फलंदाज तोंड लपवताना दिसले

England beat India in third T20I : इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात भारतीय संघाची फलंदाजी पूर्णपणे ढेपाळली. इंग्लंडच्या वेगवान आणि शिस्तबद्ध गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाजांनी अक्षरशः शरणागती पत्करली.
India batting collapse against England 3rd T20I

India batting collapse against England 3rd T20I

esakal

Updated on

England vs India, 3rd T20I Marathi Update News : भारताची फलंदाजी तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात अक्षरशः कोलमडली... २०१ धावांचा पाठलाग करताना पॉवर प्लेमध्ये इंग्लंडच्या गोलंदाजांनी निम्मा संघ तंबूत पाठवला. त्यानंतर श्रेयस अय्यरच्या संघाला सावरणे अवघड झाले आणि एक लाजीरवाणा पराभव भारताला पत्करावा लागला. इंग्लंडने १२५ धावांनी मॅच जिंकून मालिकेत २-० अशी आघाडी घेतली. भारतीय संघ ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये प्रथमच सलग पाच सामन्यांत एकही विजय मिळवू शकलेला नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com