

Joburg Super Kings
Sakal
इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वीच वादाला सुरुवात झाली आहे. कोलकाता नाईट रायडर्सला त्यांच्या संघातील वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रेहमानला (Mustafizur Rahman) काढून टाकावे लागले आहे.
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर भारतातून बांगलादेशी खेळाडूंच्या आयपीएलमध्ये (IPL 2026) खेळण्याला विरोध झाला होता. त्यानंतर बीसीसीआयने कोलकाताला मुस्तफिजूरला संघातून काढण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर कोलकाताकडून (KKR) या आदेशाचे पालन करण्यात आले आहे.