

KKR Confirms Release of Mustafizur Rahman
Sakal
KKR Confirms Release of Mustafizur Rahman: इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धे मार्च ते मे दरम्यान खेळवली जाणार आहे, पण या स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वीच वादाची ठिणगी पडली आहे. बांगलादेशमध्ये हिंदूवर अत्याचार होत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत.
अशात बांगलादेशी खेळाडूंना भारतात खेळण्याला विरोध होत आहे. आयपीएलमधून बागंलादेशचा खेळाडू मुस्तफिजूर रेहमानची (Mustafizur Rahman) हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी होत होती.
त्याबाबत देशभरातून अनेक अपीलही करण्यात आले होते. आता अखेर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) निर्णय घेतला असून कोलकातानाईट रायडर्सनेही त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. रेहमानला कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) आयपीएल २०२६ लिलावात ९.२० कोटी रुपयांना खरेदी केले आहे.