Vaibhav Sooryavanshi Fifty: पोराने पुन्हा कमाल केली! वैभवची षटकार खेचून फिफ्टी... शमीला सलाम अन् प्रतिस्पर्धींना फोडला घाम

Vaibhav Sooryavanshi 42 ball fifty in Duleep Trophy 2026 : दुलीप ट्रॉफी 2026 च्या उपांत्य फेरीत वैभव सूर्यवंशीने पुन्हा एकदा आपल्या आक्रमक फलंदाजीची झलक दाखवली. पूर्व विभागाकडून खेळताना वैभवने मध्य विभागाच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई केली.
Duleep Trophy 2026

Vaibhav Sooryavanshi 42 ball fifty in Duleep Trophy 2026

esakal

Updated on

East Zone vs Central Zone Duleep Trophy 2026: वैभव सूर्यवंशीने पुन्हा एकदा दमदार खेळ केला.. मध्य विभागाच्या गोलंदाजांची धुलाई करताना त्याने पू्र्व विभागासाठी वादळी खेळी केली. त्याच्या अर्धशतकाने संघाला उपांत्य फेरीच्या या सामन्यात आघाडीच्या दिशेने कूच करून दिली आहे. अभिमन्यू इश्वरनसह त्याने पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. मिळालेल्या जीवदानाचा फायदा उचलून त्याने खणखणीत षटकार खेचले. अर्धशतक पूर्ण होताच त्याने डग आऊटमध्ये बसलेल्या मोहम्मद शमीला कडक सलाम ठोकला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com