Duleep Trophy Final: कर्णधार ईशान किशन पुन्हा चमकला, पण शतक थोडक्यात हुकलं; पडिक्कलनं घेतला शानदार कॅच; Video

Ishan Kishan Wicket in Duleep Trophy Final : दुलीप ट्रॉफी २०२६ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पूर्व विभागाचा कर्णधार ईशान किशनने पहिल्या डावातील २७० धावांनंतर दुसऱ्या डावातही शानदार खेळी केली. त्यामुळे चौथ्या दिवस अखेरपर्यंत पूर्व विभागाने ५५० हून अधिक धावांची आघाडी घेतली आहे.
Ishan Kishan Wicket | Duleep Trophy Final | East Zone vs South Zone

Ishan Kishan Wicket | Duleep Trophy Final | East Zone vs South Zone

Sakal

Updated on

Duleep Trophy Final, East Zone vs South Zone: दुलीप ट्रॉफी २०२६ स्पर्धेचा अंतिम सामना पूर्व विभाग विरुद्ध दक्षिण विभाग संघात चेन्नईमध्ये सुरू असून चौथ्या दिवसाचा खेळ पूर्ण झाला आहे. अद्यापही पूर्व विभागाची पकड सामन्यावर मजबूत असून आता त्यांच्याकडे तब्बल ५८४ धावांची मोठी आघाडी आहे. दुसऱ्या डावातही पूर्व विभागाचा कर्णधार ईशान किशन चमकला आहे. त्याने अर्धशतक पूर्ण केले, पण त्याचं शतक २० धावांनी हुकलं. पूर्व विभागाकडून शिखर मोहननेही अर्धशतक केले.

Ishan Kishan Wicket | Duleep Trophy Final | East Zone vs South Zone
Duleep Trophy: शमी-मुकेशच्या माऱ्यासमोर दक्षिण विभागाची दाणादाण; पण पडिक्कल पाठोपाठ तिलक वर्माची झुंज, ठोकली तिसरी फिफ्टी
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com