WPL 2024 MIW Vs RCBW : एलिस पेरी एकटी भिडली, मात्र मुंबईने आरसीबीच्या मुसक्या आवळल्या

WPL 2024
WPL 2024esakal

WPL 2024 MIW Vs RCBW : वुमन्स प्रीमियर लीग 2024 च्या दुसऱ्या सेमी फायनल सामन्यात आज दोन स्टार संघ मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर बेंगलोर यांच्याच लढत होत आहे. स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या आरसीबीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र मुंबईच्या गोलंदाजांनी आरसीबीला चांगलेच वेसन घातले. अखेर एलिस पेरीच्या झुंजार अर्धशतकाच्या जोरावर आरसीबीने 20 षटकात 6 बाद 135 धावा केल्या आहेत.

WPL 2024
ICC CT 2025 : पाकिस्तानची पुन्हा गोची होणार... आयसीसी हात खेचणार, चॅम्पियन्स ट्रॉफी दुसऱ्या देशात होणार?

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या आरसीबीची अवस्था मुंबईने 4 बाद 49 धावा अशी केली होती. स्मृती मानधना, सोफी डिवाईन या सलामीवीर प्रत्येकी 10 धावांवर बाद झाले. दिशा कसात देखील भोपळाही न फोडता माघारी गेली. मुंबईकडून नॅटसिवर ब्रंट आणि मॅथ्यूज हेली यांनी सुरूवातीचे धक्के दिल्यानंतर सैका इशाकने मधली फळी उडवण्यास सुरूवात केली.

दरम्यान एलिसा पेरी आणि रिचा घोष यांनी डाव सावरत आरसीबीला 15 षटकात 84 धावांपर्यंत पोहचवले होते. मात्र 14 धावा करणाऱ्या घोषला मॅथ्यूजने बाद करत आरसीबीची अवस्था 5 बाद 84 अशी केली.

WPL 2024
IPL 2024 MS Dhoni CSK : तर हे धोनीच्या निवृत्तीचं कारण ठरेल... माजी खेळाडूने धोनीबाबत दिले मोठे संकेत?

अखेरच्या पाच षटकात एलिस पेरीने झुंजार फलंदाजी करत आपले अर्धशतक पूर्ण केलेच त्याचबरोबर तिने शेवटच्या षटकापर्यंत किल्ला लढवत संघाला 125 धावांच्या पार पोहचवले. दरम्यान वरहेमने तिला 10 चेंडूत 18 धावा करत आक्रमक साथ दिली. यामुळे आरसीबीने 20 षटकात 6 बाद 135 धावांपर्यंत मजल मारली. पेरीने 50 षटकात 66 धावांची खेळी केली. मुंबईकडून मॅथ्यूज, नॅट सिवर ब्रंट आणि सैका इशाकने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

(Cricket News In Marathi)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com