Viral Video : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकताच, शिवम दुबे ट्रेनने तातडीने मुंबईसाठी रवाना का झाला? भारतीय खेळाडूने सांगितलं कारण...

Why Shivam Dube travelled by train after T20 World Cup win? ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकल्यानंतर संपूर्ण भारतीय संघ सेलिब्रेशनमध्ये मग्न असताना शिवम दुबे मात्र वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम येथे फायनल जिंकल्यानंतर काही तासांतच दुबेने मुंबईकडे ट्रेनने प्रवास करण्याचा निर्णय घेतला.
Why Shivam Dube travelled by train after T20 World Cup win

Why Shivam Dube travelled by train after T20 World Cup win

esakal

Updated on

Shivam Dube Ahmedabad to Mumbai train journey reason: भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू शिवम दुबे याने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप विजयानंतर अहमदाबाद हून मुंबईकडे येण्यासाठी ट्रेनने प्रवास का केला, यामागचं कारण सांगितलं. भारतीय संघाने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिमवर न्यूझीलंडवर दणदणीत विजय मिळवून ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकला. या विजयानंतर शिवम त्याच्या वडिलांना व मुलाला भेटण्यासाठी खूप उत्सुक होता; त्यामुळे, संघातील इतरांसोबत विमानाने जाण्यासाठी न थांबता ट्रेनने प्रवास करण्याचा निर्णय घेतला. आपल्या पत्नी आणि एका मित्रासोबत प्रवास करत, दुबे याने अहमदाबादहून मुंबईला जाणाऱ्या ३-टियर एसी ट्रेनने प्रवास केला, कारण त्या मार्गावरील सर्व विमानांची तिकिटे आरक्षित झाली होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com