

England vs New Zealand 1st Test
Sakal
England vs New Zealand, 1st Test: आयपीएल २०२६ स्पर्धा संपल्यानंतर आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट हंगामाला जोरदार सुरूवात झाली आहे. गुरुवारपासून (४ जून) इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड (ENG vs NZ) संघात कसोटी मालिकेतील (Test Series) पहिला सामना सुरू झाला आहे.
हा सामना लंडनमधील लॉर्ड्समध्ये (Lord's Test) होत असून पहिल्याच दिवशी दोन्ही संघातील फलंदाजांना गोलंदाजांनी चांगलेच सतावल्याचे दिसले आहे. त्यामुळे लॉर्ड्सवरील असमान पृष्ठभाग असलेली खेळपट्टीवर पहिल्याच दिवशी तब्बल १६ विकेट्स पडल्याचे दिसले.