T20 World Cup : इंग्लंड-ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कप फायनल खेळणार; दक्षिण आफ्रिकेचा उपांत्य फेरीत दारूण पराभव

England vs South Africa Women's T20 World Cup: महिला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेच्या उपांत्य फेरीत इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेवर ४० धावांनी दणदणीत विजय मिळवत अंतिम फेरीत धडक मारली.
England Women reach T20 World Cup Final

England Women reach T20 World Cup Final

esakal

Updated on

England Storm into Women's T20 World Cup Final: इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात महिला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेची फायनल रविवारी ऐतिहासिक लॉर्ड्सवर होणार आहे. ऑस्ट्रेलियाने सहावेळा हा वर्ल्ड कप उंचावला आहे, तर २००९ च्या जेतेपदानंतर इंग्लंड चौथ्यांदा फायनल खेळणार आहे. त्यांना त्यांच्या दुसऱ्या जेतेपदाचा शोध आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यात त्यांनी माजी उपविजेत्या दक्षिण आफ्रिकेवर ४० धावांनी विजय मिळवला. ७५ धावा अन् दोन झेल, अशी उल्लेखनीय कामगिरी करणारी नॅट शिव्हर ब्रंट प्लेअर ऑफ दी मॅच ठरली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com