Cricketer Retirement: रुटचा क्रिकेटला अलविदा! निवृत्ती घेताना म्हणाला, '१४ वर्षात अनेक चढ-उतार आले, पण...'

Joe Root's Brother Billy Root Announces Retirement: इंग्लंडच्या कसोटी संघाचा कर्णधार जो रुट याचा लहान भाऊ बिली रुट याने क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. त्याने सोशल मीडियावर पोस्ट करत निवृत्तीबद्दल माहिती दिली.
Joe Root's Brother Billy Root Announces Retirement

Joe Root's Brother Billy Root Announces Retirement

Sakal

Updated on

इंग्लंड कसोटी संघाचा कर्णधार जो रुट (Joe Root) याचा धाकटा भाऊ बिली रूट हा देखील क्रिकेटपटू आहे. पण बिली रुट याने वयाच्या ३४ व्या वर्षी प्रोफेशनल क्रिकेटमधून निवृत्तीची (Retirement) घोषणा केली आहे. ग्लॅमॉर्नग काऊंटी संघाकडून खेळणाऱ्या तीन फलंदाजांनी या आठवड्यात निवृत्ती घेतली, ज्यात ख्रिस कूक आणि कॉलिन इन्ग्रामसह बिली रुटचाही समावेश आहे.

बिली रुटने (Billy Root) कारकिर्दीतील शेवटच्या हंगामात फक्त दोन काउंटी चॅम्पियनशिप सामने खेळले आणि क्लबच्या दुसऱ्या संघाचे कर्णधारपद भूषवले आहे. त्याने निवृत्ती घेताना आता पुढील आध्यायाची वेळ आली असल्याचे म्हटले आहे.

Joe Root's Brother Billy Root Announces Retirement
Joe Root चा वर्ल्ड रेकॉर्ड! बॅटिंगनंतर फिल्डिंगमध्येही नंबर १; स्मिथ-द्रविडला टाकले मागे
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com