

England Cricket Board: आजकाल जगभरात अनेक फ्रँचायझी क्रिकेट स्पर्धा खेळल्या जातात. फक्त भारतातच नाही, तर पाकिस्तान, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, वेस्ट इंडिज, युएई, कॅनडा, युएसए अशा अनेक देशांमध्ये क्रिकेटच्या लीग स्पर्धा होतात.
मात्र यामुळे देशांतर्गत क्रिकेटचा दर्जा ढासळू नये म्हणून इंग्लंड क्रिकेट बोर्डाने मोठा निर्णय घेतला आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने देशांतर्गत क्रिकेटमधील गुणवत्ता टिकून रहावी म्हणून त्यांच्या खेळाडूंवर पाकिस्तान सुपर लीगसह इतक काही फ्रँचायझी लीग स्पर्धा खेळण्यापासून निर्बंध घातले आहेत.