

Fast bowler John Turner Retirement
Sakal
England Pacer John Turner Retires at 25: क्रिकेटविश्वातून मोठी बातमी समोर येत आहे, चक्क २५ व्या वर्षीच एका क्रिकेटपटूने प्रोफेशनल क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. हा क्रिकेटपटू म्हणजे इंग्लंडचा जॉन टर्नर. त्याने नुकतेच तो प्रोफेशन क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली असल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
वेगवान गोलंदाज असलेल्या टर्नरने सातत्याच्या दुखापतींना कंटाळून निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये हॅम्पशायरचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच तो इंग्लंडसाठीही दोन वनडे आणि दोन टी२० असे चार आंतरराष्ट्रीय सामने खेळला असून ३ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने २०२४ मध्ये वेस्ट इंडिज दौऱ्यातून इंग्लंडसाठी पदार्पण केले होते.