

Kapil Dev On Rohit Sharma Retirements
Sakal
Kapil Dev React On Rohit Sharma Retirements: भारताचा वनडे संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर असून या दौऱ्यातील अखेरचा सामना लंडनमधील प्रसिद्ध लॉर्ड्स मैदानात रविवारी (१९ जुलै) हौणार आहे.
तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत सध्या पहिल्या दोन सामन्यात १-१ अशी बरोबरी झालेली आहे. त्यामुळे तिसरा सामना निर्णायक आहे. या सामन्यात जो संघ जिंकेल, तो ही मालिकाही जिंकणार आहे.
मात्र या सामन्यापूर्वीच एक धक्कादायक चर्चा सुरू आहे. हा सामना भारताचा दोनवेळचा आयसीसी ट्रॉफी विजेता कर्णधार रोहित शर्माचा हा अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना ठरू शकतो अशी चर्चा होत आहे. यावर भारताचा दिग्गज कर्णधार कपिल देव यांनी मोठे विधान केले आहे.