IND vs ENG, 3rd T20I : भारताविरुद्ध आघाडी घेण्यासाठी इंग्लंडचा संघ सज्ज! सामन्यासाठी यजमानांची Playing XI जाहीर

England's Playing XI for 3rd T20I against India: भारत आणि इंग्लंड संघात तिसरा टी२० सामना मंगळवारी खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी इंग्लंडने प्लेइंग इलेव्हन जाहीर केली आहे.
England Cricket Team

England Cricket Team

Sakal

Updated on

IND vs ENG 3rd T20I: भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर असून ५ सामन्यांची टी२० मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता, तर दुसरा सामना इंग्लंडने सहज जिंकत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. आता तिसरा सामना मंगळवारी (७ जुलै) ट्रेंट ब्रिजच्या नॉटिंगघममध्ये (Nottingham, Trent Bridge) खेळला जाणार आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे.

या सामन्यात विजय मिळवून मालिकेत आघाडी घेत मालिका पराभवाची जोखीम टाळण्याचा इंग्लंडचा प्रयत्न असेल, तर भारतीय संघ मालिकेत बरोबरी करण्यासाठी प्रयत्नशील असेल. अशातच आता या सामन्याच्या एक दिवसआधीच इंग्लंडने प्लेइंग इलेव्हन (England's Playing XI) जाहीर केला आहे.

England Cricket Team
U19 IND vs SL : ९ चौकार अन् १ षटकार... द्रविडच्या लेकाची जोरदार फटकेबाजी; पण श्रीलंकेने सामना जिंकत केली ODI मालिकेत बरोबरी
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com