U19 IND vs SL : ९ चौकार अन् १ षटकार... द्रविडच्या लेकाची जोरदार फटकेबाजी; पण श्रीलंकेने सामना जिंकत केली ODI मालिकेत बरोबरी

Anvay Dravid's Stormy 87 Goes In Vain: भारतीय युवा संघाला श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात अन्वय द्रविड आणि अर्जून राजपूत यांनी केलेली अर्धशतकं व्यर्थ गेली.
Anvay Dravid | U19 Sri Lanka vs U19 India

Anvay Dravid | U19 Sri Lanka vs U19 India

Sakal

Updated on

India U19 vs Sri Lanka U19 Youth ODI: भारताचा १९ वर्षांखालील संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात दोन्ही युवा संघामध्ये वनडे मालिका सुरू असून सोमवारी (६ जुलै) झालेल्या दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेचा १९ वर्षांखालील संघाने ८ विकेट्सने विजय मिळवला.

दिमंथा महाविथानाने नाबाद दीडशतकी खेळी केल्याने श्रीलंकेला हा विजय मिळवणे सोपे गेले. त्यामुळे आता या मालिकेत १-१ अशी बरोबरी झाली आहे. पहिला सामना भारतीय संघाने जिंकला होता. त्यामुळे आता ९ जुलैला होणारा तिसरा सामना निर्णायक असणार आहे.

Anvay Dravid | U19 Sri Lanka vs U19 India
Anvay Dravid In India U19 Team : राहुल द्रविडच्या मुलाची भारतीय संघात निवड! श्रीलंका दौऱ्यासाठी BCCI ची घोषणा, संपूर्ण वेळापत्रक
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com