
अँडरसन - तेंडुलकर ट्रॉफी २०२५ कसोटी मालिकेतील दुसरा सामना खेळण्यासाठी भारत आणि इंग्लंड दोन्ही संघ सज्ज आहेत. दुसरा कसोटी सामना बुधवारपासून (२ जुलै) सुरू होणार आहे. हा सामना बर्मिंगहॅममधील एजबस्टन येथे भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी ३.३० वाजता सुरु होणार आहे. दोन्ही संघांसाठीही हा सामना महत्त्वाचा असणार आहे.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप २०२५-२७ स्पर्धेचा भाग आहे. याशिवाय इंग्लंडने पहिला सामना जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी घेतलेली आहे. त्यामुळे इंग्लंड मालिकेतील आघाडी आणखी भक्कम करण्याच्या प्रयत्नात असेल, तर भारतासमोर पुनरागमन करण्याचे आव्हान आहे.