

ENGLAND vs NEW ZEALAND 1st Test
Sakal
ENG vs NZ WTC 2025-27: इंग्लंड क्रिकेट संघाने न्यूझीलंडला कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्याच चौथ्या दिवसाच्या (रविवारी, ७ जून) सुरुवातीलाच पराभवाचा मोठा धक्का दिला आहे. लॉर्ड्स मैदानात झालेल्या या सामन्यात इंग्लंडने ११५ धावांनी विजय मिळवला. ही कसोटी मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप २०२५-२७ (WTC 2025-27) स्पर्धेचा भाग असल्याने या सामन्याचा पाँइंट्स टेबलवरही परिणाम झाला आहे.