
New Zealand vs England 2nd Test: न्यूझीलंड क्रिकेट संघाला मोठा धक्का रविवारी बसला आहे. न्यूझीलंडला मायदेशातील इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मलिकेतील दुसऱ्या सामन्यात तिसऱ्याच दिवशी ३२३ धावांनी पराभव स्वीकारावा लागला.
इंग्लंडने न्यूझीलंडविरुद्ध कसोटीत मिळवलेला हा धावांच्या तुलनेतील सर्वात मोठा विजय आहे. याशिवाय इंग्लंडने तीन सामन्यांची कसोटी मालिकाही २-० अशी विजयी आघाडी घेत खिशात टाकली आहे. दरम्यान, या पराभवामुळे न्यूझीलंडला आणखी एक मोठा धक्का बसला आहे.