
New Zealand vs England 2nd Test: न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड संघात वेलिंग्टनमधील बासिन रिझर्व स्टेडियमवर कसोटी मालिकेतील दुसरा सामना होत आहे. या सामन्यात इंग्लंडचे वर्चस्व दिसून येत आहे.
याबरोबरच इंग्लंडचा वेगवान गोलंदाज गस ऍटकिन्सनने शानदार कामगिरी केली असून त्याने हॅट्रिक साजरी केली आहे. याबरोबरच त्याने मोठा विक्रमही केला आहे.
शुक्रवारी सुरु झालेल्या या सामन्यात दुसऱ्या दिवशी न्यूझीलंडच्या पहिल्या डावात ३५ व्या षटकात ऍटकिन्सनने हॅट्रिक घेतली. पहिल्या दिवशी न्यूझीलंडचा संघ ८६ धावांवर ५ विकेट्स अशा स्थितीत होता.