Cameron Green’s smart registration as a specialist batsman in IPL 2026
esakal
IPL 2026 auction Cameron Green strategy explained : इंडियन प्रीमिअर लीग २०२६ साठीच्या लिलावाची तयारी झाली आहे... अबु धाबीमध्ये येत्या मंगळवारी दुपारी २:३० वाजल्यापासून लिलावाला सुरूवात होईल आणि पहिल्या सेटमध्येच यंदाच्या लिलावातील सर्वात महागडा खेळाडू मिळण्याचे भाकित आहे. या सेटमध्ये ऑस्ट्रेलियाच्या कॅमेरून ग्रीनचा समावेश आहे आणि त्याला मोठी रक्कम देऊन आपल्या ताफ्यात घेण्यासाठी बऱ्याच फ्रँचायझींमध्ये चुरस रंगण्याचा अंदाज आहे. पण, कॅमेरूनने त्याचा 'भाव' आणखी वाढावा यासाठी मोठी खेळी केली आहे आणि ती यशस्वी होईल असाही अंदाज आहे.