Cristiano Ronaldo - MS Dhoni JerseySakal
Cricket
Ronaldo Jersey Fact Check: रोनाल्डोच्या घरात टांगलीय धोनीची जर्सी ? थाला फॉर रिझन म्हणण्यापूर्वी viral video पाहाच
Number 7 Jersey on Cristiano Ronaldo's Wall: रोनाल्डोने शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये दिसणारी जर्सी धोनीचीच आहे का? यामागील सत्य जाणून घ्या.
Cristiano Ronaldo - MS Dhoni Jersey: जगातील लोकप्रिय खेळाडूंमध्ये भारतीय क्रिकेटपटू एमएस धोनी आणि पोर्तुगालचा फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो यांचे नाव आवर्जून घेतले जाते. या दोघांनाही मोठा चाहता वर्ग आहे.
नुकताच रोनाल्डोने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो चांगलाच चर्चेत आला आहे. या व्हिडिओमध्ये रोनाल्डोच्या मागे पिवळ्या रंगाची, ज्यावर ७ आकडा लिहिला आहे, अशी जर्सी दिसत आहे.
त्यामुळे काही सोशल मिडिया युजर्सने ती जर्सी एमएस धोनीची आहे, असा दावा केला आहे. काहींनी रोनाल्डोही धोनीचा चाहता असल्याचंही म्हटलं आहे.

