Shahid Afridi faces backlash in Pakistan after India clinched the 2007 T20I World Cup.
esakal
Viral footage of Pakistan violence against Shahid Afridi post 2007 T20I WC : आजच्याच दिवशी बरोबर २००७ मध्ये भारतीय संघाने पाकिस्तानला पराभूत करून पहिला वहिला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकला होता. जोगिंदर शर्माच्या चेंडूवर मिसबाह उल हकचा एस श्रीसंतने झेल घेतला आणि त्यानंतर टीम इंडियाने एकच जल्लोष केला. भारताने ५ धावांनी हा सामना जिंकून महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली इतिहास घडवला होता. आज त्या वर्ल्ड कप विजयाच्या आठवणी माजी खेळाडूंनी ताज्या केल्या. इरफान पठाण, रॉबिन उथप्पासह अनेक खेळाडूंनी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २००७ च्या विजयाचे फोटो पोस्ट करून पाकिस्तानच्या जखमेवर मीठ चोळले.