FACT CHECK : हॅरिस रौफवर ३ सामन्यांची बंदी, Asia Cup Final नाही खेळणार? भारताला डिवचणे पडले महागात, ICC ची कारवाई

Will Haris Rauf miss Asia Cup final 2025? आशिया कप २०२५ दरम्यान पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हारिस रौफ अडचणीत सापडला आहे. मैदानावर खेळताना त्याने केलेले "युद्धाशी संबंधित उल्लेख" आणि भारतीय प्रेक्षकांशी केलेले गैरवर्तन यामुळे आयसीसीने त्याच्यावर कारवाई केली.
will Haris Rauf banned for 3 matches in Asia Cup 2025?

will Haris Rauf banned for 3 matches in Asia Cup 2025?

esakal

Updated on

Haris Rauf ICC action India vs Pakistan controversy : भारत आणि पाकिस्तान यांच्यात आशिया चषक स्पर्धेची फायनल होणार आहे. यापूर्वीच्या दोन्ही सामन्यांत भारताने शेजाऱ्यांना पराभवाचं पाणी पाजलं. पण, त्या सामन्यात बऱ्याच नाट्यमय घडामोडी घडल्या. पहलगाम हल्ल्यानंतर IND vs PAK हे प्रथमच क्रिकेटच्या मैदानावर समोरासमोर आले, परंतु त्या सामन्यात भारतीय संघाने शेजाऱ्यांशी हस्तांदोलन केले नाही. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ( PCB) रडारड सुरू केली. दुसऱ्या सामन्यात हॅरिस रौफ व साहिबजादा फरहान यांच्या वादग्रस्त सेलिब्रेशनने वाद निर्माण झाला. आता या प्रकरणाची आयसीसीने दखल घेतली आणि हॅरिस रौफवर तीन सामन्यांच्या बंदीची शिक्षा सुनावली, अशी पोस्ट सध्या व्हायरल होतेय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com