Pakistan will play India in the T20 World Cup 2026 only under certain conditions
esakal
Pakistan condition to play India fact check: पलटी मारण्यात पाकिस्तान पटाईत आहे. पाकिस्तानी खेळाडू निवृत्ती जाहीर करून ४-५ दिवसात ती मागे घेत असल्याचा इतिहास आहे. त्यामुळे पाकिस्तान आता कितीही दावा करत असेल की, ते ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारताविरुद्ध खेळणार नाही, तरी शेवटपर्यंत ते त्यांचा निर्णय बदलू शकतात. भारताविरुद्ध न खेळून होणारं नुकसान त्यांना पेलणारं नाही. त्यामुळेच पाकिस्तान सरकारने निर्णय जाहीर केला असला तरी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ( PCB ) अजून अधिकृतपणे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला ( ICC) काही कळवलेले नाही. त्यात आता पाकिस्तानने भारताविरुद्ध खेळण्याची तयारी दर्शवली आहे, परंतु त्यांनी एक अट ठेवल्याचे वृत्त पाकिस्तानी मीडियाने दिले आहे.