

Fakhar Zaman suspension reason PSL Level 3 offence explained
esakal
Fakhar Zaman Penalised for On-Field Misconduct : पाकिस्तान सुपर लीग (PSL)मध्ये रोज नवनवीन वाद होताना दिसत आहेत... लीग सुरू होऊन ५ दिवसही झालेले नाहीत आणि रोज पाकिस्तानी खेळाडू त्यांचा रंग दाखवताना दिसतायत. आता फखर जमान चेंडूशी छेडछाड ( ball-tampering offense) केल्याच्या धक्कादायक गुन्ह्यात दोषी आढळला आहे. लाहोरमधील गद्दाफी स्टेडियमवर लाहोर कलंदर्स (LQ) आणि कराची किंग्स (KK) यांच्यातील सामन्यानंतर सामनाधिकाऱ्यांनी घेतलेल्या सुनावणीत, फखर जमानने आरोप नाकारले असूनही, त्याला कठोर शिक्षा सुनावण्यात आली आहे.