

Hardik Pandya Bengaluru Villa
Sakal
Hardik Pandya Bengaluru Villa Video: भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) मुंबईतून आता बंगळुरूमध्ये स्थायिक झाल्याची बातमी यापूर्वीच आली होती. त्याने त्याच्या क्रिकेटसाठी हा निर्णय घेतला असल्याचे समजत होते.
तो आता बंगळुरूमध्ये (Bengaluru) एका नव्या व्हिलामध्ये राहात आहे, त्याच्या घराची झलक त्याच्या एका चाहत्याने दिली आहे. विशेष म्हणजे हा चाहता त्याच्यासाठी ओडिशावरून सायकल प्रवास करत बंगळुरूला आला होता. या चाहत्याचे नाव दीपक कुमार आहे.