Gautam Gambhir | India vs South Africa Test
Sakal
Cricket
IND vs SA: 'गौतम गंभीर हाय हाय...' भारताच्या पराभवानंतर प्रशिक्षकाच्या समोरच चाहत्यांची घोषणाबाजी; Video Viral
Crowd Raises Slogans Targeting Coach Gambhir: दक्षिण आफ्रिकेने गुवाहाटी कसोटीत ४०८ धावांनी विजय मिळवत २५ वर्षांनंतर भारतात कसोटी मालिका जिंकली. भारताच्या या पराभवानंतर गौतम गंभीरविरुद्ध चाहत्यांनी स्टेडियममध्ये घोषणाबाजी केली.
Summary
गुवाहाटी कसोटीत दक्षिण आफ्रिकेकडून भारताला ४०८ धावांनी पराभव पत्करावा लागला.
दक्षिण आफ्रिकेने या विजयासह मालिकेत २-० ने भारताला व्हाईटवॉश दिला.
वर्षभरात दुसऱ्यांदा मालिकेत पराभव झाल्याने प्रशिक्षक गौतम गंभीरवर टीका होत असून, चाहत्यांनी स्टेडियममध्ये घोषणाबाजी केली.

