फुटबॉल चाहत्यांसाठी गुडन्यूज! अखेर FIFA World Cup चे सामने भारतात दिसणार; कोणासोबत अन् किती रुपयांची झाली डील?

FIFA World Cup 2026 India Broadcaster: २०२६ चा फिफा वर्ल्ड कप अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको येथे होणार आहे. या स्पर्धेला सुरू होण्यासाठी १० दिवसच बाकी असताना आता भारतातील प्रसारण हक्क विकले गेले आहेत. त्यामुळे भारतीय फुटबॉल चाहत्यांना वर्ल्ड कपचा आनंद घेता येणार आहे.
FIFA World Cup 2026

FIFA World Cup 2026

Sakal

Updated on

फिफा वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा (FIFA World Cup 2026) ११ जूनपासून सुरू होणार आहे. हा वर्ल्ड कप अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको येथे होणार आहेत. मात्र या स्पर्धेचे सामने भारतात दिसणार की नाही, याबाबत संभ्रम होता.

पण आता हा संभ्रम दूर झाला असून भारतातील फुटबॉल चाहत्यांनाही फिफा वर्ल्ड कपचा आनंद घेता येणार आहे. कारण भारतातील सामन्यांच्या प्रसारणाचे हक्क खरेदी करण्यात आले आहेत. झी एंटरटेनमेंट एंटरप्राइज लिमिटेडने (ZEEL) हे हक्क विकत घतले आहेत.

FIFA World Cup 2026
FIFA सोबत डील जाहीर होताच Zee Entertainment च्या शेअर्समध्ये जोरदार उसळी! पाहा नेमकं काय घडलं?
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com