Siddhesh Lad Puts Mumbai in Command Against Delhi in Ranji Trophy
esakal
Mumbai vs Delhi Ranji Trophy Siddhesh Lad century: यशस्वी जैस्वाल, सर्फराज खान या युवा फलंदाजांनी टीम इंडियाकडून पदार्पण केले आहे. यशस्वी, तर टीम इंडियाच्या कसोटी संघाचा नियमित सलामीवीर झाला आहे. सर्फराजला देशांतर्गत क्रिकेट गाजवूनही कसोटी संघात पुरेशी संधी मिळालेली नाही. असे असताना मुंबईचा आणखी एक फलंदाज टीम इंडियाचे दार ठोठवू पाहतोय.. रणजी करंडक स्पर्धेच्या २०२५-२६ च्या हंगामात त्याने खोऱ्याने धावा केल्या आहेत. दिल्ली विरुद्ध सध्या सुरू असलेल्या सामन्यात त्याने शतकी खेळी करून मुंबईला संकटातून बाहेर काढत आघाडी मिळवून दिली आहे.