

Shapoor Zadran
Sakal
Shapoor Zadran Health Update: क्रिकेटविश्वातून सध्या एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कधीकाळी आपल्या वेगासाठी ओखळला जाणारा स्टार खेळाडू सध्या आयुष्याची लढाई लढत आहे, हा खेळाडू म्हणजे अफगाणिस्तानचा माजी वेगावान (Afghanistan's Former Pacer) गोलंदाज शपूर झादरान. त्याच्यावर सध्या भारतात उपचार सुरू असून त्याची अवस्था गंभीर असल्याचे समजत आहे.
झादरानने त्याच्या कारकिर्दीत अनेक स्टार फलंदाजांना बाद केलं आहे, ज्यात केन विलियम्सन, डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ, तिलकरत्ने दिलशान अशा फलंदाजांचा समावेश आहे.