
ऑस्ट्रेलियाचा माजी स्टार खेळाडू मायकल स्टेलरसमोरील अडचणी आणखी वाढल्या आहेत. गेल्या काही वर्षांपासून त्याचे नाव अनेक आरोपांमध्ये अडकले होते. आता मंगळवारी त्याला मोठी शिक्षा सुनावण्यात आली आहे.
घरगुती हिंसाचाराच्या आरोपांमध्ये दोषी आढळल्याने त्याला ४ वर्षांची कोठडी सुनावण्यात आली आहे. पण या सुनावणीनंतरही त्याला काही प्रक्रियांनंतर बाहेर मोकळे सोडण्यात येणार आहे. कारण काही अंशी त्याची शिक्षा निलंबित करण्यात आली आहे.