Rajasthan Royals Respond to Bihani Fixing Claim : लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या आयपीएल सामन्यात राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूंनी मॅच फिक्सिंग केल्याचा गंभीर आरोप राजस्थान क्रिकेट असोसिएशनच्या (आरसीए) तात्पुरत्या समितीचे संयोजक जयदीप बिहानी यांनी केला आहे. याशिवाय, राजस्थान रॉयल्स, राजस्थान सरकारचा क्रीडा विभाग आणि बीसीसीआय यांनी संगनमताने आरसीएला आयपीएलपासून दूर ठेवल्याचा दावाही त्यांनी केला. या आरोपांमुळे क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे.