
पाकिस्तान आणि दुबईमध्ये नुकतीच चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धा पार पडली. या स्पर्धेचे मुख्य आयोजक पाकिस्तान क्रिकेट बोर्ड होते. पण असं असतानाही गतविजेत्या पाकिस्तान संघाला या स्पर्धेत एकही सामना जिंकता आला नाही. त्यामुळे त्यांचे आव्हान साखळी फेरीतच संपले.
यानंतर पाकिस्तानने मोठा निर्णय घेतला. टी२० संघातून अनेक अनुभवी खेळाडूंना दूर केले. तसेच सलमान अली आघा याला पाकिस्तान टी२० संघाचा नवा कर्णधार म्हणून घोषित केले.