
पाकिस्तान क्रिकेट संघाला नुकताच मोठा धक्का बसला. त्यांना चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेतून साखळी फेरीतच बाहेर व्हावे लागले आहे. पण आता हे अपयश विसरुन पाकिस्तान क्रिकेट बोर्ड पुढच्या दौऱ्याची तयारी करत आहे.
पाकिस्तान या महिन्याच्या मध्यात टी२० आणि वनडे मालिका खेळण्यासाठी न्यूझीलंड दौरा करणार आहे. या दौऱ्यासाठी पाकिस्तानचा वनडे आणि टी२० संघही जाहीर झाला आहे. हे संघ जाहीर करताना पाकिस्तान निवड समितीने मोठा निर्णयही घेतल्याचे समजत आहे.