
भारत आणि इंग्लंड संघात सध्या कसोटी मालिका सुरू असून याचदरम्यान दुसऱ्या कसोटीआधी एक दु:खद बातमी समोर आली आहे. इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू वेन लार्किन्स यांचे शनिवारी (२८ जून) निधन झाले आहे.
याबाबत नॉर्थम्पटनशायर काऊंटी क्रिकेट क्लबने माहिती दिली आहे. तसेच इंग्लंड क्रिकेटकडूनही शोक व्यक्त करण्यात आला आहे. वेन लार्किन्स ७१ वर्षांचे होते. ते गेल्या काही दिवसांपासून आजारी होते.