

Viral Cricket Moment
Sakal
Funny Cricket Viral Video: क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ म्हणतात, कारण मैदानात कधी काय होईल, हे सांगता येत नाही. बऱ्याचा एखाद्या चेंडूवर किंवा एखाद्या षटकात संपूर्ण सामना पलटतो, तर कधी एखादी विकेटही सामन्याला कलाटणी देऊ शकते.
कधी कधी काही विनोदी घटनाही मैदानात घडतात, ज्याचे व्हिडिओही अनेकदा व्हायरल होतात. असाच एक व्हिडिओ व्हायरल होत असून त्यावर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. शेवटच्या चेंडूवर नाट्यमय घटना घडल्याचे या व्हिडिओतून दिसते.