कसोटी क्रिकेट खरंच मजेशीर आहे...
दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातली जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल पाहताना हे प्रत्येक सत्राला जाणवले. आयसीसी स्पर्धेच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ पोहोचला, म्हणजे जेतेपद हे त्यांचेच, हे समीकरणच गेली कित्येक वर्ष आपण पाहतोय. पण, त्याला आज तडा गेला. 'चोकर्स' दक्षिण आफ्रिका जे आयसीसी स्पर्धेत हमखास माती खाणारे, त्यांनी ऑस्ट्रेलियाच्या मक्तेदारीला सुरूंग लावला... १५ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाचा संघ आयसीसीच्या फायनलमध्ये हरला, तर २७ वर्षानंतर दक्षिण आफ्रिकेने आयसीसी ट्रॉफी जिंकली.