तापाने त्रस्त असूनही संजू सॅमसन केरळ क्रिकेट लीग २०२५ मध्ये रुग्णालयातून थेट मैदानावर उतरला.
त्याला हॉस्पिटलमध्ये सलाईन व प्राथमिक उपचार दिल्यानंतर त्याने कोची ब्लू टायगर्ससाठी सामना खेळला.
सामन्यानंतर संजू पुन्हा रुग्णालयात गेला आणि आता तो घरी विश्रांती घेत आहे.
Brave Sanju Samson fighting spirit : भारतीय संघाचा यष्टीरक्षक-फलंदाज संजू सॅमसन हा तापाने फणफणला होता आणि त्याच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. पण, केरळ क्रिकेट लीग २०२५ मध्ये आपल्या संघासाठी तो रुग्णालयामधून थेट क्रिकेटच्या मैदानावर खेळायला आला. गुरुवारी दुपारी संजू तिरुअनंतपूरम येथील रुग्णालयामध्ये उपचार घेत होता. त्याने प्राथमिक उपचार घेतले आणि त्याला सलाईनही लावले गेले होते. पण, त्यानंतर तो सायंकाळी कोची ब्लू टायगर्स संघासाठी तो मैदानावर उतरला.