
भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यात अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी ही कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेतील दुसरा सामना बर्मिंगहॅमला सुरू आहे. दुसऱ्या सामन्याच्या पहिल्याच दिवशी यशस्वी जैस्वाल आणि कर्णधार शुभमन गिल यांच्या दमदार कामगिरीमुळे भारताने ५ बाद ३१० धावा केल्या आहेत.
पण असे असले तरी अद्याप भारताची तिसऱ्या क्रमांकाची चिंता मिटली नसल्याचे दिसत आहे. या कसोटीसाठी भारताने तीन मोठे बदल केले होते. यामध्ये तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाजही बदलण्यात आला.