
इंग्लंडविरुद्ध हेडिंग्लेमध्ये भारताने पहिला कसोटी सामना ५ शतके केल्यानंतरही गमावला होता. या सामन्यात भारताच्या मधली फळी आणि तळातील फलंदाजी फळी कोलमडली होती. त्यामुळे दुसऱ्या सामन्याआधी भारतीय संघाने आता चुका सुधारण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला आहे. भारताने दुसऱ्या सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये तीन मोठे बदल केले आहेत.
भारत आणि इंग्लंड संघात सुरू असलेल्या अँडरसन - तेंडुलकर ट्रॉफी स्पर्धेतील दुसरा सामना बर्मिंगहॅमला बुधवारपासून (२ जुलै) खेळवला जात आहे.