Shubman Gill साठी गौतम गंभीर, अजित आगरकर आग्रही होते, पण 'ते' दोघं नको म्हणाले अन् T20 World Cup संघातून पत्ता कट झाला

Why Shubman Gill Missed T20 World Cup? भारतीय ट्वेंटी-२० वर्ल्ड कप संघाच्या निवडीदरम्यान शुभमन गिलबाबत मोठा वाद झाला असल्याची माहिती समोर आली आहे. निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर हे शुभमन गिलच्या निवडीसाठी आग्रही होते. मात्र त्या दोघांनी गिलच्या समावेशाला विरोध केल्यामुळे अखेर त्याचा पत्ता कट झाला.
Ajit Agarkar wanted Shubman Gill in India’s T20 World Cup squad

Ajit Agarkar wanted Shubman Gill in India’s T20 World Cup squad

esakal

Updated on

Inside Story Of Shubman Gill’s T20 World Cup Snub Revealed : उप कर्णधार शुभमन गिलची ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या संघात निवड न होणे, हा सध्या भारतीय क्रिकेट वर्तुळातील हॉट टॉपिक आहे. आशिया चषक स्पर्धेनंतर शुभमनची ट्वेंटी-२० संघात निवड होणे आणि त्याला उप कर्णधारपद देणे... या सर्व घडामोडीनंतर त्याचे वर्ल्ड कप खेळणे निश्चित मानले जात होते. शुभमनसाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये संजू सॅमसनच्या स्थानावर प्रयोग होत राहिले... पण, इतकं सर्व करूनही शुभमनला ट्वेंटी-२० फॉरमॅटमध्ये काही खास करता आले नाही. पण, त्याला वगळण्याचं हेच एक कारण नाही. शुभमनच्या नावाला निवड समिती प्रमुख अजित आगरकर ( Ajit Agarkar) याचा होकार होता, परंतु त्या दोघांनी नकार दिला अन् संघातून त्याची हकालपट्टी झाली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com