Gautam Gambhir: 'काही रात्री खूप एकट्या असतात..'; दिल्लीच्या मैदानात येताच गंभीरचा 'हळवा कोपरा' समोर; BCCI ने शेअर केला Video

Gautam Gambhir Emotional Delhi Homecoming : बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडिओत गौतम गंभीरने त्याचं काम, घर आणि सपोर्ट स्टाफसोबतच्या जिव्हाळ्याच्या नात्याबद्दलही भाष्य केले. तसेच संघातील हलकं फुलकं वातावरण ठेवण्याचा प्रयत्न असंही म्हणाला.
Gautam Gambhir

Gautam Gambhir

Sakal

Updated on

Gautam Gambhir Emotional Delhi Homecoming : टी२० वर्ल्ड कप २०२५ स्पर्धेत भारत आणि नामिबिया यांच्यातील सामना गुरुवारी (१२ फेब्रुवारी) नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. भारताचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरसाठी हे घरचे मैदान आहे. गंभीर दिल्लीमध्ये लहानाचा मोठा झाला असून तो देशांतर्गत क्रिकेटही दिल्लीकडून खेळला.

इतकेच नाही, तर दिल्ली कॅपिटल्स या आयपीएलमधील संघाचाही तो भाग होता आणि कर्णधारही राहिला आहे. त्यामुळे त्याच्यासाठी दिल्ली खास आहे. अशात आता भारताचा वर्ल्ड कपमधील सामना दिल्लीत होत आहे. या सामन्याआधी गंभीरने (Gautam Gambhir) त्याच्या घरी सर्व भारतीय संघासाठी (Team India) 'डिनर पार्टी'ही ठेवली होती.

<div class="paragraphs"><p>Gautam Gambhir</p></div>
T20 World Cup: पाकिस्तानच्या बहिष्काराच्या निर्णयावेळी कसे होतं भारताच्या ड्रेसिंग रुमधील वातावरण? प्रशिक्षकांनी केला खुलासा
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com