T20 World Cup: पाकिस्तानच्या बहिष्काराच्या निर्णयावेळी कसे होतं भारताच्या ड्रेसिंग रुमधील वातावरण? प्रशिक्षकांनी केला खुलासा

India's Response to Pakistan Boycott: पाकिस्तानने आधी टी२० वर्ल्ड कपमधील भारताविरुद्ध सामना न खेळण्याचा निर्णय घेतला होता, पण त्यांनी काही दिवसांनी हा निर्णय बदलला. यादरम्यान भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये कसे वातावरण होते, याबाबत सहाय्यक प्रशिक्षकांनी खुलासा केला आहे.
Team India

Team India

Sakal

Updated on

India's Response to Pakistan Boycott: टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बहुचर्चित सामना रविवारी (१५ फेब्रुवारी) खेळवला जाणार आहे. हा सामना कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. पाकिस्तान संघ त्यांचे सर्व सामने श्रीलंकेच खेळणार असल्याने भारतीय संघ या सामन्यासाठी कोलंबोला जाईल.

काहीदिवसांपूर्वीच पाकिस्तानने या सामन्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय मागे घेतला आहे, त्यामुळे हा सामना नियोजित वेळेनुसारच होणार आहे. या सामन्याबाबत सोमवारी (९ फेब्रुवारी) भारताचे सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डोईशेट यांनी भाष्य केले होते. त्यांनी हा सामना होणार असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. याशिवाय त्यांनी सांगितले की भारतीय संघ (Team India) सुरुवातीपासूनच या सामन्यासाठी तयार होता.

<div class="paragraphs"><p>Team India</p></div>
T20 World Cup: 'भारताला दोन रात्री सराव अन् आम्हाला मात्र...', सामन्यापूर्वी नामिबियाच्या कर्णधाराची तक्रार
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com