

छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा सांगणारा छावा चित्रपट सध्या संपूर्ण भारतात गाजत आहे. जसेच भारताबाहेरील अनेक चित्रपटगृहातही या चित्रपटाला प्रतिसाद मिळत आहे. पहिल्याच आठवड्यात या सिनेमाचा प्रभाव देशभर दिसून आला आहे.
अनेकांनी या चित्रपटाचे भरभरून कौतुक केले आहे. महाराष्ट्रातही जोरदार प्रतिसाद छावा चित्रपटाला मिळाला आहे. तसेच देशभरातूनही अनेकजण चित्रपटाबद्दल व्यक्त होत आहेत. त्यामुळे सध्या चित्रपटातगृहातही हाऊसफुलचा बोर्ड लागत आहे.