IND vs NZ 1st T20I Gautam Gambhir reaction : भारतीय संघाने पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात न्यूझीलंडवर ४८ धावांनी विजय मिळवून ५ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यानंतर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याचे ट्विट चर्चेत आले आहे. न्यूझीलंडकडून वन डे मालिकेत हार पत्करावी लागल्यानंतर गौतमवर प्रचंड टीका झाली. त्यात गौतमने नागपूर सामन्यानंतर पोस्ट लिहिली, जी व्हायरल झाली आहे.